Thursday, September 22, 2011

आबा - गण्या, अरे एवढी हौसेने भिकबाळी करून घेतली आहेस तर मग ती घालत का नाहीस ?
गण्या - मी ती घरी भिंतीवर टांगून ठेवली आहे.
आबा - का ?
गण्या - आमच्या घरी भिंतीलासुद्धा कान आहेत. त्यांना उगीच वाईट वाटायला नको.

Monday, July 4, 2011

Mix-veg प्रमाणे mix-non-veg अशी डिश का नसते ?
तरुण मंडळातील कार्यकर्त्यांच्या बराचश्या मित्र-मैत्रिणीची लग्ने सध्या होत आहेत. असेच एकाने बाब्याला विचारले, "तुझे लग्न कधी ?"
बाब्या - मी लसीकरण केले आहे.
समोरचा माणूस - काय ?
बाब्या - सध्या लग्नाचा रोग साथीच्या रोगाप्रमाणे पसरत चालला आहे. त्यापासून स्वत:ला वाचण्यासाठी मी लसीकरण केले आहे.


समोरचा माणूस गप्पच बसला.

Tuesday, June 21, 2011

आयटी दिंडीची माहिती वाचली. दिंडीमध्ये सहभागी होतंय ते चांगले आहे पण त्यात "आयटी" चा वेगळा झेंडा कशाला ? उद्या "गण्या दिंडी", "पक्या दिंडी" अश्या स्वत:च्या, स्वत:पुरत्या दिंड्या काढून गण्या-पक्या दिंडीमध्ये सहभागी झाले तर आश्चर्य वाटायला नको.

Tuesday, June 14, 2011

Hinjawadi first ची बातमी वाचली. एवढे software engineers एकत्र येवून काहीतरी करत आहेत याचा आनंद वाटला. पण त्याचसोबत एक प्रश्न उपस्थित झाला. हे लोक ज्या पुण्यात/चिंचवडात राहतात त्याची स्थिती हि नक्कीच हिंजवडीपेक्षा खराब आहे. यासाठी हे लोक एकत्र का येत नाहीत ?
हल्लीच्या मुली अजूनही "चूल-मुल" या संकल्पनेत आहेत. आता फक्त "चूल-मुल" ची व्याख्या थोडी बदलली आहे.
..
हल्लीच्या मुलींना मुलं फिरवायला हवी असतात आणि त्यांच्यासोबत हॉटेलात जाऊन (चुलीवरचे जेवण) खायचे असते !